Posts

Home made ice cream butterscotch

Image
          Butterscotch icecream नॅचरल आईसक्रीम बेस:- 1 कप मिल्क पावडर 1 कप दुध,1टी स्पून साखर घालून मिक्स करून घेणे. जाडसर पॅन (स्टिलचे भांडे) गॅसवर सतत 2 मि उकळणे . थंड झाल्यावर 1 कप व्हिप क्रीम घालणे ते सर्व बिट करणे. फ्रिज सेटींग:- आईसक्रीम करायच्या अगोदर 2 तास फ्रीजर maximaum करुन ठेवणे व आईसक्रीम सेट झाल्यावर फ्रीजरच tempreture मध्यम करणे icecream सेट होण्यास 6-7 तास लागतात. बटर स्कॉच:- नॅचरल बेस घेणे.1/2 टी स्पून बटर स्कॉच इसेन्स किंवा बटर स्कॉच क्रश घालणे.1मी बिट करणे. खलील बटर स्कॉच चिक्की व्हीपिंग करून घालणे.1 मी बिट करणे . चिक्की :- कोरड्या कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये 2 टी स्पून साखर घालणे. गोल्डन ब्राउन कलर आल्यानंतर पाव टी स्पून अमूल बटर टाकणे व 2 टी स्पून काजू/बदाम/अक्रोड चिप्स टाकून तूप / बटर लावलेल्या ट्रे मध्ये थापणे .

Strabery icecream home made ice cream

Image
                  स्ट्राबेरी icecream  नॅचरल आईसक्रीम बेस:- 1 कप मिल्क पावडर 1 कप दुध,1टी स्पून साखर घालून मिक्स करून घेणे. जाडसर पॅन (स्टिलचे भांडे) गॅसवर सतत 2 मि उकळणे . थंड झाल्यावर 1 कप व्हिप क्रीम घालणे ते सर्व बिट करणे . फ्रिज सेटींग:- आईसक्रीम करायच्या अगोदर 2 तास फ्रीजर maximaum करुन ठेवणे व आईसक्रीम सेट झाल्यावर फ्रीजरच tempreture मध्यम करणे icecream सेट होण्यास 6-7 तास लागतात. स्ट्राबेरी :- नॅचरल बेस आईसक्रीम घेणे, पाव चमचा स्ट्राबेरी इसेन्स किंवा पाव कप स्ट्राबेरी पल्प घालणे . 1 मि बिट करून icecream सेट करणे.

Home made ice cream

Image
                        पायनॅपल नॅचरल आईसक्रीम बेस:- 1 कप मिल्क पावडर 1 कप दुध,1टी स्पून साखर घालून मिक्स करून घेणे. जाडसर पॅन (स्टिलचे भांडे) गॅसवर सतत 2 मि उकळणे . थंड झाल्यावर 1 कप व्हिप क्रीम घालणे ते सर्व बिट करणे. फ्रिज सेटींग:- आईसक्रीम करायच्या अगोदर 2 तास फ्रीजर maximaum करुन ठेवणे व आईसक्रीम सेट झाल्यावर फ्रीजरच tempreture मध्यम करणे icecream सेट होण्यास 6-7 तास लागतात. पायनॅपल:- नॅचरल बेस आईसक्रीम घेणे, 1/2टी स्पुन पायनॅपल इसेन्स घालणे .पाव टी स्पून yellow कलर घालणे बीट करणे.पाव कप पायनॅपल क्रश घालणे. 1 मि बिट करणे व सेट करने.,

Shivaji maharaj shiv kalin chayachitre

Image
🚩  छत्रपती शिवाजी महाराज यांची          शिवकालीन छाया चित्रे  🚩         18 शतकात काढलेलं हे छाया चित्र, बडोदा संस्थानच्या संग्रहालयात आहे. त्यात एका हातात फूल तर डाव्या हातात पट्टा अन् कमरेला ढाल आहे.  यामध्ये मॉस्को येथील संग्रहालयात ठेवलेले हे छायाचित्र किशनगड येथील महाराज सावंतसिगं यांचे चित्रकार निहाल चंद्र यांनी १७५० मध्ये हे चित्र काढलं. यात राजांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात दानपट्टा दाखवण्यात आला आहे. हे चित्र लंडनमधील बॉनहॅम्सच्या संग्रहालयात आहे. फ्रांस्वा वॅलेंटीन या डच अधिकाऱ्यांच्या संग्रहालयातील हे चित्र १७६२ मध्ये प्रसिद्ध झाले असून यावर Den Heer Seva Gi असं लिहिलं आहे. १८७२ मधील रॉबर्ट आर्म यांच्या Historical Fragments या पुस्तकात हे चित्र छापलं आहे. फ्रांस्वा वॅलेंटीन या डच अधिकाऱ्यांच्या संग्रहालयातील हे चित्र १७६२ मध्ये प्रसिद्ध झाले असून यावर Den Heer Seva Gi असं लिहिलं आहे. फ्रांस्वा वॅलेंटीन या डच अधिकाऱ्यांच्या संग्रहालयातील हे चित्र १७६२ मध्ये प्रसिद्ध झाले असून यावर Den Heer Seva ...

Bundelkhand

Image
    शिवछात्रपातींच्या प्रेरणेतून उभा            राहिला बुंदेल खंड                                                               युगपुरुष   छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळे हाताशी धरले आणि त्यांच्यात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले. तीन शाह्यांशी टक्कर देऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अठरापगड जातीतून त्यांनी महायोद्धे निर्माण केले. शालिवाहन राजाने मातीच्या शिपायातून सैन्य उभे केले, अशी दंतकथा आहे. शिवरायांनी ही कथा वास्तवात आणली. शिवरायांनी दिलेले हे बाळकडू मराठ्यांच्या अनेक पिढ्यांनी जोपासले आणि औरंगजेबासारख्या अतिबलाढ्य  बादशहाला खडे चारले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा श्रीगणेशा केला, तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंबहुना त्यांचा घात करण्यासाठी आदिलशाहीने अफझलखानास पाठवले. शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचा कनकगिरीच्या वेढ्यात याच अ...

Purandrcha vedha

Image
           पुरंदरचा वेढा व तह  सुरतेवर छापा :  या विजयानंतर शिवराय स्वस्थ बसले नाहीत. औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. कुठे पुणे व कुठे सुरत ? सुरत म्हणजे त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ. खूप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाहा भयंकर चिडला. त्याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिझाराजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. त्याच्या सोबतीला दिलेरखान हा आपला विश्वासू सरदार दिला. अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही बरोबर दिला. जयसिंग आणि दिलेरखान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात, तोच सन १६६४ मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली. शहाजीराजे यांचे शिकारीच्या प्रसंगी...

Shivrajyabhishek sohala

Image
    🚩 शिवराज्याभिषेक सोहळा🚩 राज्याभिषेक का केला ? : रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यांतून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले. शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता दयावी, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षांनंतर सर्व धमांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले.हे त्यांनी स्वत:च्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी. स्वराज्याची राजधानी: शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली, रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोईचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प...