Bundelkhand
शिवछात्रपातींच्या प्रेरणेतून उभा राहिला बुंदेल खंड
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा श्रीगणेशा केला, तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंबहुना त्यांचा घात करण्यासाठी आदिलशाहीने अफझलखानास पाठवले. शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचा कनकगिरीच्या वेढ्यात याच अफझलखानाने कपटाने मृत्यू घडविला होता. या अफझलखानाला शिवरायांनी भेटीवेळी यमसदनास धाडले. अफझलखानासारख्या बलाकब सरदाराचा वध आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा संपूर्ण पाडाव झाला. आदिलशाहीला हा जबर धक्का बसलाच; पण इंग्रज, पोर्तुगीज, डच आदी परकीयांनीही या घटनेची दखल घेतली. महाराष्ट्रासह देशभर अफझलखानाच्या वधाचे पडसाद उमटले.
अफझलखानापाठोपाठ शिवरायांनी शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्याचे, त्याची बोटे तोडण्याचे वृत्त हिंदुस्थानात वाऱ्यासारखे पसरले. खानाची छावणी एक लाखांची. एवढ्या मोठ्या लष्करातून आत घुसून शिवरायांनी औरंगजेबाचा मामा असलेल्या शाहिस्तेखानाची बोटे तोडून मोगल बादशाहीचे नाकच कापले. मोगलांसह आदिलशाही, कुतुबशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी या घटनेची दखल घेतली.
महाराजांनी आपल्या मुलखापासून दूर असलेल्या सुरतेवर अचानक छापा घातला. सुरत लुटली. त्याचाही हिंदुस्थानभर गाजावाजा झाला. सुरत हे मोगल राजवटीचे नाक, शिवरायांनी मोगलांना आव्हान दिल्याने त्यांच्याविषयी सामान्य जनतेत कौतुक आणि आदराची भावना निर्माण झाली.
या सर्वांवर कळस चढवला, तो आग्याहून सुटकेच्या चित्तथरारक प्रसंगाने आणि भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाचा केलेल्या अवमानाने! दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आले. तेव्हा त्यांना त्यांच्या मानाप्रमाणे जागा मिळाली नाही. महाराजांचा संताप झाला. दरबारात खड्या आवाजात बोलणे म्हणजे बेअदबी: पण महाराजांनी क्रोधाने जणू गर्जनाच केली. खिलत नको, सन्मान नको, असे खडसावून महाराजांनी बादशहाकडे सरळ पाठच फिरवली. बादशहाला पाठ न दाखवता मागे जायचे, हा दरबारी रिवाज. तो महाराजांनी पायदळी तुडवला. मिझो राजा जयसिंग पुत्र रामसिंहाने त्यांना कसेबसे आपल्या हवेलीत आणले. शिवरायांच्या या स्वाभिमानी वर्तनाने सारा दरबार थक्क झाला. आम्यात खळबळ उडाली. बादशहाच्या अपमानाची कल्पना कोणी स्वप्नातसुद्धा केली नसेल! महाराजांच्या या स्वाभिमानी वर्तनाचा डंका साऱ्या हिंदुस्थानात गाजला; एवढेच नये तर इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल या परदेशांतही शिवरायांचे नाव पोहोचले.
या घटनेनंतर पाताळयंत्री औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराज आणि संभाजीराजे यांचे प्राण धोक्यात आले. अशावेळी शिवरायांनी अतिशय धीरोदात्तपणे, धीरगंभीरपणे परिस्थितीला तोंड दिले. फुलादखानासारख्या कडव्या अंमलदाराच्या कडेकोट मगरमिठीतून सुटणे अशक्यप्रायच होते; पण महाराजांनी मोठ्या हिकमतीने आणि युक्तीने या नजरकैदेतून संभाजीराजांसह सहीसलामत सुटका करून घेतली. ते मिठाईच्या पेटाऱ्यातून निसटले, पेटारे नेणाऱ्या हेलकऱ्यांच्या वेशातून बाहेर पडले की, धार्मिक कार्यासाठी आलेल्या साधू-महंतांच्या मेळ्यातून निघून गेले, याविषयी इतिहास मूक आहे. काहीही
असले, तरी औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून त्याच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली.
शिवरायांच्या या अभूतपूर्व धाडसी कृत्याने मोगली सल्तनतीला जबरदस्त धक्का बसला. औरंगजेबाचा तिळपापड उडाला. या प्रकरणाने कमालीची खळबळ माजली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याभोवती दैवी पुरुषाचे तेजोवलय निर्माण झाले. परकालदास राजस्थानी पत्रातून, इंग्रज, पोर्तुगीज, डचांच्या पत्रातून देश परदेशात शिवरायांचे नाव दुमदुमले.
शिवरायांच्या या अशा एकापेक्षा एक साहसी आणि ज्वलज्जहाल स्वातंत्र्यनिष्ठ पराक्रमांनी तत्कालीन हिंदुस्थानी समाजात शिवराय आपले तारणहार ही भावना दृढ झाली. मोगली, मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जुलमी जोखडापासून सुटका करून घ्यावयाची, तर त्यासाठी शिवरायांच्याच स्वातंत्र्याचा मंत्र जपला पाहिजे. याचाही साक्षात्कार जनतेला झाला. मोगल-मुस्लिम राजवटीविरोधात यल्गार करण्याची जिद्द बाळगणारेही काही जण होते. त्यापैकी एक बुंदेलखंडातला. या तरुण योद्ध्याचे नाव छत्रसाल बुंदेला. दुसरा वीर हिंदुस्थानच्या ईशान्य टोकाच्या आसाम राज्यातील. लचित बडफुकन हे या नरशार्दुलाचे नाव.
छत्रसाल बुंदेला
शिवरायांच्या प्रेरणेने बुंदेलखंडचे स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल बुंदेला हा चंपतराय बुंदेला याचा चौथा पुत्र. त्याचा जन्म १६४९ चा. या चंपतरायाची विश्वासघाताने हत्या झाली. तेव्हा तो १२ १३ वर्षांचा होता. औरंगजेबाने शिवरायांवर मिर्झा राजा जयसिंग याला पाठवले. त्याच्या सैन्यात छत्रसाल होता. विजापूरवरील स्वारीत, देवगडच्या (छिंदवाडा) लढाईत त्याची चमक दिसून आली. तथापि, मोगली कारभाराला छत्रसाल विटला होता. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य कार्य त्याच्या समोर होते. पुरंदर स्वारीवेळी त्याने शिवरायांची भेट घेतली. आपल्याला सेवेत घ्यावे, म्हणून त्याने विनंती केली. तथापि, शिवरायांनी त्याला बुंदेलखंडात जाऊन तिथे मोगली सत्तेविरोधात बंड पुकारण्याची प्रेरणा दिली. छत्रसालाने शिवरायांचा उपदेश शिरोधार्थ मानला.
तेव्हा बुंदेलखंडातील त्याचे भाऊ, आप्तस्वकीय सारे मोगलांच्या चाकरीत होते. दतिया नरेश शुभकर्ण यासह अनेक जहागीरदार मोगलांचे ताबेदार होते. अशा बिकट परिस्थितीत छत्रसालने प्रारंभी छोटे सैन्य उभे केले. लहान-लहान जहागिरी कब्जात घेतल्या. १६६९ साली औरंगजेबाने जिझिया कर लादला आणि हिंदूंची मंदिरे पाडण्याचा सपाटाच लावला. त्या विरोधात
छत्रसालने आवाज उठवला. सर्वसामान्य लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा औरंगजेबाची नजर त्याच्याकडे वळली. औरंगजेबाने ३० हजार सैन्यानिशी
रणदुल्लाह खान याला छत्रसालवर पाठवले. छत्रसालने गनिमी काव्याने त्याची ससेहोलपट केली. तहव्वूरखान, अन्वर खान, बहलोदखान, हमीद, मुराद खान, सय्यद अफगाणी अशा अनेक मोगली सरदारांना त्याने पाणी पाजले. इटावा, गढ़ाकोटा, रामगढ, धामौनी, शाहगढ यासह कलिंजरचा किल्ला जिंकला. १६७१ सालात त्याने बुंदेलखंडचे स्वातंत्र्य जाहीर केले. बुंदेलखंडावर त्याने आपले संपूर्ण वर्चस्व निर्माण केले. बुंदेलखंड केसरी म्हणून त्याचा लौकिक झाला. अखेर मोगली सत्तेला त्याच्या स्वातंत्र्याला मान्यता द्यावी लागली. १७२९ मध्ये प्रयागचा मोगली सुभेदार महम्मद बंगश याने बुंदेलखंडवर स्वारी केली, तेव्हा छत्रसालने बाजीराव पेशवा यास मदतीची हाक दिली. बाजीरावाने तातडीने येऊन बंगशचा पराभव केला. छत्रसालाची संकटातून सुटका केली. छत्रसालने बाजीरावाला आपला तिसरा मुलगा मानले. त्याला आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बहाल केला. पन्ना येथील हिऱ्याच्या खाणीतील वाटा दिला. शिवरायांच्या प्रेरणेतून छत्रसालाने बुंदेलखंड स्वतंत्र केला. संकट आले, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशाने पेशवे याने त्याचे रक्षण त्यातून मराठ्यांना बाजीराव केले उत्तर हिंदूस्थानात विस्तारची संधी मिळाली.
लचित बडफुकुन
आसामात तेराव्या शतकापासून अहोम राजवंशाची राजवट होती. सतराव्या शतकात आसामला मोगलांचे ग्रहण लागले. बलाढ्य मोगलांचा ज्याने आपल्या रणकौशल्याने पाडाव केला, स्वातंत्र्य परत मिळवले, तो वीर म्हणजे लचित बडफुकन. बडफुकन म्हणजे सेनापती. लचित हा अहोम राजाचा सेनापती होता. त्याचा जन्म १६२२ सालचा. औरंगजेबाने १६६९ मध्ये हिंदूविरोधात मोठी मोहीमच उघडली. जिझिया कर लादला. हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. जी काही थोडी हिंदू राज्ये होती, त्या राज्यांवर आक्रमण केले. गुवाहाटीचा इटाकुली हा महत्त्वाचा किल्ला मोगलांच्या ताब्यात होताच. आता साऱ्या आसामचा घास घ्यायचा औरंगजेबचा मनसुबा ठरला.मोगलांचे आज ना उद्या आक्रमण होणार, हे लक्षात घेऊन लचित बडफुकनने आधीच हालचाल केली. इटाकुली किल्ला कब्जात घ्यायची योजना ठरवली. एका काळोख्या रात्री लचितने आपले १० १५ शूर सैनिक निवडले. त्यांनी गुपचूप किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यातील तोफा निकामी केल्या आणि सकाळ होते न होते तोच, लचितने किल्ल्यावर धडक मारली. लचितच्या ताब्यात भक्कम किल्ला आला. त्याची पिछाडीची बाजू सुरक्षित झाली. लचितने आपले लष्कर सुसज्ज बनवले. आक्रमण आले, तर ते ब्रह्मपुत्रा नदीमार्गे येणार. त्याने छोट्या आणि चपळ युद्धनौका बनवल्या. आपल्या नौसैनिकांना खडतर प्रशिक्षण दिले. हेरांचे पक्के जाळे विणले. शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने जय्यत तयारी केली.
कुचराईबद्दल सख्ख्या मामाला प्राणदंड
साल १६७१! मिर्झा राजा जयसिंग याचा पुत्र रामसिंह प्रचंड सैन्य घेऊन चालून आला. ब्रह्मपुत्रा नदीमार्गे मोठ्या प्रमाणावर आरमारी गलबते, तोफा अशा युद्ध साहित्यासह हे लष्कर ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात आले. एका बाजूला कामाख्या देवीचे मंदिर, दुसऱ्या बाजूला विष्णू मंदिर आणि तिसऱ्या बाजूला होता इटाकुली किल्ला. मोगलांचे सैन्य येत आहे, याची खबर मिळताच लचितने तिसऱ्या बाजूला भक्कम तटबंदी उभारण्याचे ठरवले. आपला मामा मोमाई तामुली याच्यावर त्याने ही जिम्मेदारी सोपवली; पण मामाने चालढकल केली. लचित संतापला. त्याने कुचराईबद्दल मामाचे मुंडके उडवले. देशापेक्षा माझा मामा मोठा नाही, हे या बहाद्दराचे उद्गार. लचितने मग आपल्या देखरेखीखाली संरक्षक तटबंदी पूर्ण केली.
सरायघाटची लढाई
रामसिंहाला अडवण्यासाठी लचितरे नदीपात्रात नावांचे पूल उभे केले होते. या लढाईवेळी लचित खूप आजारी होता. तापाने फणफणलेला असतानाही लचित. जातीने युद्ध नेतृत्व करीत होता. मोगलांची अवाढव्य लढाऊ गलबते आली; पण त्यांच्या माऱ्यात न सापडता लचितच्या बच्छारिना छोटया नौकांनी या जहाजांना पद्धतशीर वेढा घालीत, एकेक जहाज बुडवण्याला प्रारंभ केला. अनेक गंलवते फुटली. चार हजार मोगल सैनिक गारद झाले. भारतीय इतिहासात असे नदीतील जलयुद्ध क्वचितच झाले असेल. लचित बडफुकनने शिवरायांच्या प्रेरणेने मोगलांचा पराभव केला. आसामचे स्वातंत्र्य अबाधित राखले. पूर्वेकडे हातपाय पसरण्याचे औरंगजेबाचे स्वप्न भंगले.
बुंदेलखंड आणि आसामात झालेल्या या स्वातंत्र्यलढ्यांना यंदा साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. शिवरायांची हीच प्रेरणा पुढे जाटांनी घेतली, शिखांनी घेतली. मोगलांची राजवट झुगारून दिली. शिवरायांच्या याच प्रेरणेतून मराठे सरदारांनी हिंदुस्थान गाजवला. मराठ्यांना रोखण्यासाठी बंगालमध्ये कोलकात्याला इंग्रजांना 'मराठा. डिच नावाचा ५ किलोमीटरचा खंदक खोदावा लागला. अटकेपार मराठी तलवारी, तळपल्या. शिवरायांच्या स्वातंत्र्याची प्रेरणा आजही शत्रूविरोधात लढताना आपल्या जवानांना स्फूर्ती देत आहे...
Comments
Post a Comment