Khanachi fajiti
शायिस्ताखानाची फजिती शायिस्ताखानाची स्वारी : विजापूरच्या आदिलशाहाने जंगजंग पछाडले, पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही. त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला. शेवटी आदिलशाहा नरम झाला. त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले. यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली. मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. मुघलांच्या स्वाच्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने आपला मामा शायिस्ताखान याला शिवरायांवर पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते. शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या. शिरवळ, शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत शायिस्ताखान पुष्य आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढेपुढेच येत होता, पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठे अतिशय चपळ, भीमथडी तट्टावर बसणारे! चटणी भाकरी खावी, अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरद...